खरंच भगतसिंह हे कम्युनिस्ट होते का?

भगतसिंह हे कम्युनिस्ट होते, हे वाक्य अनेक वेळा कम्यूनिस्ट लोकाकडुन ऐकल किंवा सोशल मीडिया वर कम्युनिस्ट लोकांनी लिहलेल वाचल असेल कारण भगतसिंह जीवनाच्या शेवटच्या काळात कम्युनिस्ट लोकांनी लिहलेली पुस्तके वाचायचे आणि ते कम्युनिस्ट विचारधारेने प्रभावित झाले होते, म्हणुन भगतसिंह यांना भारतातील कम्युनिस्ट लोक कम्युनिस्ट मानत होते.


  (महान स्वतंत्र सेनानी आणि क्रांतिकारी भगतसिंह)

पण ही गोष्ट फक्त एक संकुचित मत (Narrow Minded Opinion) आहे, आता मी “The Red Files Documentry” च्या माध्यमातून विस्तृत चित्र दाखवण्याचा प्रर्यन्त करणार आहे.

तेव्हा तुम्हांला वास्तविकता लक्षात येईल भगतसिंह यांच्या बाबतीत जे चालेल आहे, त्या संकल्पना चे नाव आहे, विनियोग (Appropriation) असं आहे. जेव्हा एखादी कम्युनिटी एखाद्या व्यक्तीला आयकॉनला आपल सांगु लागले आणि जेव्हा असं होत नाही.

तेव्हा त्याला Appropriation असं म्हणल जात आता भगतसिंह यांच्या जीवनातील आशा काही महत्वाच्या मुद्द्यावर मी सांगणार आहे, ज्यावर कम्युनिस्ट कधीच बोलताना किंवा या मुद्याबद्दल लोकांना कधीच सांगताना मी पाहिल नाही.

१) भगतसिंह यांच शिक्षण भगतसिंह यांच शिक्षण कोणत्या शाळेतून झाल होत, हा खुप महत्वाचा पॉइंट आहे. कम्युनिटी म्हणतात की भगतसिंह जेलमध्ये कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकानी लिहलेली पुस्तके वाचली होती.

पण त्यापेक्षा जास्त पुस्तक त्यांनी शाळेत वाचली असणार आणि भगतसिंह यांच शिक्षण दयानंद एंग्लो वैदिक स्कुलमधुन शिक्षक झाल होत.

आणि आणि ही शाळा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली होती, आणि आज पण ही शाळा डीएव्ही नावाने ओळखली जाते. तसेच देशात अनेक राज्यात या शाळेच्या अनेक शाखा आहेत, आता ज्या लॉजिक ने कम्युनिस्ट लोक भगतसिंह यांना कम्युनिस्ट म्हणत असतात.

मग आम्ही त्यांच लॉजिक ने भगतसिंह यांना आर्य समाजी म्हणाव का?

२) भगतसिंह यांच्या बरं रामप्रसाद बिस्मिल यांच नाव जोडल जात, रामप्रसाद बिस्मिल यांनी एक पार्टी स्थापन केली होती त्या पार्टीच नाव होत. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRP) या पार्टीच्या लोकानी ब्रिटीशांच्या विरोधात अनेक विद्रोह केले होते. त्यामधील प्रसिद्ध विद्रोह होता, काकोरी काण्ड या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या साथीदारानी ट्रेन लुटली होती.

तेव्हा इंग्रजानी या पक्षाच्या जाहीरनामा (Manifesto) ला कोर्टात पुरावा म्हणुन सादर केल होत.

भगतसिंह या पक्षाचे सदस्य बनले होते आणि तुम्हांला रामप्रसाद बिस्मिल यांच्याबद्दल थोडी जरी माहिती असेल तर हे माहिती असेलच की रामप्रसाद बिस्मिल हे एक आर्य समाजी होते. या ठिकाणी भगतसिंह हे HRA या पार्टीचे सदस्य झाले या गोष्टी मी का महत्व देतोय यांचे दोन कारणे आहेत.

पहिल कारण हा पक्ष चालवणारे रामप्रसाद बिस्मिल हे आर्य समाजी होते. दुसर कारण 25 डिसेंबर 1925 ला भारतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) ची स्थापना करण्यात आली होती. आणि भगतसिंह हे कम्युनिस्ट पार्टी चे सदस्य न होता, HRA चे सदस्य झाले होते.

बिस्मिल नंतर या पक्षात भगतसिंह चंद्रशेखर आजाद सारंखे सदस्य जॉइन झाले होते. पुढे यांनी खुप काम केली होती. या पक्षाच्या नावात पुढे जावुन सोशलिस्ट शब्द टाकण्यात आला आणि या पक्षाचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन करण्यात आल होत.

भगतसिंह यांनी HRA जॉइन केल्यानंतर पक्षाच्या नावात सोशलिस्ट शब्द जोडण्यात आला यावरून आपण असं म्हण शकतो की भगतसिंह यांना सोशलिस्ट प्रिंसिपल जास्त आवडत होते. कारण असं म्हणल जात की त्यांच्यामुळेच पक्षाच्या नावात सोशलिस्ट शब्द जोडण्यात आला होता.

३) या ठिकाणी लाला लाजपत राय आणि भगतसिंह यांचा संबंध समजतो सायमन कमिशन चा विरोध करत्या वेळी लाला लाजपत यांची हत्या करण्यात आली होती.

आणि लाला लाजपत राय यांची हत्या करणाऱ्या त्या अधिकाऱ्याचे नाव होत जेम्स कॉट पुढे जाऊन जेम्स कॉट यांची हत्या करण्यासाठी भगतसिंह आणि HSRA यांच्या बाकी सदस्यानी प्लॅन केला होता. पण चुकून यांनी दुसरा अधिकारी (Saunders) सॉन्डर्स ला गोळी मारली होती.

आता लाला लाजपत राय कोण होते हे सांगण्याची गरज नाही. त्यांना पंजाब केसरी असं म्हणल जात. आणि ते एक हिंदू नॅशनलिस्ट होते, आणि भगतसिंह कम्युनिस्ट होते, तर मग त्यांनी एका हिंदू नॅशनलिस्टच्या हत्येचा बदला घेण्याकरिता एवढा मोठा प्लॅन केला का होता?

आणि तेव्हा देशात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (communist party of India) पण अस्तित्वात होती. तरी भगतसिंह हे HSRA ला जॉइन झाले होते, आणि एका हिंदू नॅशनलिस्टच्या हत्येचा बदला घेत होते.

त्यानंतर भगतसिंह आणि त्यांच्या पक्षाच्या लोकानी संसद बॉम्ब स्फोट केला होता, आणि त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर फाशी देण्यात आली होती.

आता महत्वाचा मुद्दा ज्याच्यावर जास्त बोलल जात, 1920 शेवटी पासून ते 1931 पर्यत भगतसिंह हे जेल मध्ये होते. जेलमध्ये असताना भगतसिंह यांनी खुप साऱ्या लोकांनी लिहलेली पुस्तके वाचली होती.

पण या ठिकाणी फक्त या गोष्टी वर फोकस केल केल जात की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली होती. आता या ठिकाणी मी एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहे, काही आर्टिकल आणि पुराव्याणी हे सिध्द केल जाऊं शकत की भगतसिंह यांनी जेवढी पुस्तकें वाचली होती.

त्या पुस्तकामध्ये दोन पुस्तकें आशा व्यक्तिची होती, ज्यांचा भारतातील कम्युनिस्ट आणि कांग्रेस पार्टी चे लोक द्वेष करतात.

त्या व्यक्तीच नाव आहे, “वीर सावरकर” या पुस्तकांत वीर सावरकर यांनी 1857 च्या क्रांतीवर आधारित पुस्तक होत ज्यांच नाव The Indian War of independence 1957 हे पुस्तक होता.

आणि दुसर पुस्तक (हिन्दू) मराठा राजाच्या वर लिहल पुस्तक “हिंदू पद पादशाही” हे पुस्तक होता.

या पुस्तकाना भगतसिंह फक्त वाचल नाही तर या पुस्तकांतील काही महत्वाचे मुद्दे त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवले होते. आणि माहिती आपल्याला गुगलवर मिळू शकते आता असं म्हणु शकतो का की भगतसिंह हे हिंदुत्ववादी व्यक्तींच्या विचाराने प्रभावित झाले होते.

जसं कम्युनिस्ट म्हणतात की ते लेनीन च्या विचारा ने प्रभावित झाले होते. आणि अजून एक गोष्ट त्या काळात लेनन संपुर्ण जगात एक प्रसिद्ध व्यक्ति होता, आणि जेवढे पण क्रांतिकारक होते, ते लेनीन च्या विचारधारेने प्रभावित झाले होते. कारण लेनीन ने एक क्रांतिकारी काम केल होत, कम्युनिज्म त्या काळात एक चांगली विचारधारा मानली जात होती.

कारण ती आदर्श विचारधारा पेपर वर वाटत होती, पण जेव्हा ही विचारधारा वेग-वेगळ्या देशात लागु करण्यात आली होती. तेव्हा काय झाल सर्वांना माहिती आहे, यांच उदाहरण म्हणुन सोव्हिएत संघ बद्दल बोलूं लेनीन नंतर तिथे स्टॅलिन आला आणि स्टॅलिनमुळे लाखों हजारों लोकांची हत्या करण्यात आली होती.

ज्या ज्या देशात कम्युनिस्ट विचारधारा लागु करण्यात आली तिथे तिथे ही विचारधारा कुचकामी ठरली आणि लोकांची हत्या करण्यात आली भगतसिंह तेव्हा हे सगळ बघण्यासाठी या जगात नव्हते पण हे सर्व त्यांना कधीच आवडलं नसत.

हे होऊं शकतं की भगतसिंह हे लेनीन आणि कम्युनिस्टच्या विचाधारेने प्रभावित झाले असतील.

जसं की ते आर्य समाजाच्या विचारसरणी आणि वीर सावरकर यांच्या पुस्तकांतील पॉइंटने प्राभावित झाले होते, आणि ते पॉइंट स्वताच्या डायरीत लिहीत होते.

त्यांच प्रमाणे कम्युनिज्म काही ठराविक गोष्टीनी भगतसिंह प्राभावित झाले असतील पण हा एकतर्फ Narrative सेट करण की ते एक कम्युनिस्ट होते, मला हे पुर्णपणे योग्य वाटत नाही. पुढे जो पॉइंट वर बोलणार आहे, त्याला अनेक लोक क्लेम करतात आणि यांचा जास्त पुरावा मिळत नाही तरी पण तुम्ही पण यांची माहिती घेऊ शकता.

वीर सावरकर यांनी लिहलेल्या पुस्तकांची 3rd आवृत्ती भगतसिंह यांनी प्रिंट केली होती. वीर सावरकर यानी 1957 क्रांतिकारीवर पुस्तक लिहल होत, त्या पुस्तकाला इंग्रजानी भारतात बॅन केल होत आणि त्या पुस्तकांची 3rd आवृत्ति भगतसिंह यांनी प्रिंट केली होती.

आता जे लोक हे बोलतात की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली म्हणुन ते पुर्णपणे कम्युनिस्ट होते असं जे लोक बोलतात त्यांच्यासाठी एक मनोरंजक गोष्ट सांगतो जेव्हा 1909 मध्ये सावरकर हे लंडन हाऊसमध्ये राहत होते. तेव्हा वीर सावरकर आणि लेनीन यांची मिटीग फिक्स करण्यात आली होती.

जो पर्यत वीर सावरकर हे लंडन हाऊस मध्ये राहिले होते, तेव्हा चार वेळा लेनीन आणि वीर सावरकर यांच्यात मिंटींग झाली होती. मग कम्युनिस्ट अस म्हणणार का की वीर सावरकर एक कम्युनिस्ट होते कारण कम्युनिस्ट लोकांचे लॉजिक आणि आयडीया हीच आहे, की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली होती, म्हणुन ते कम्युनिस्ट होते.

आता काही गोष्टी भगतसिंह हे आपल्या किंवा जे लोक भगतसिंह यांना कम्युनिस्ट सांगतात त्यांच्या पेक्षा त्यांची विचारधारा खुप वेगळी होती.

भगतसिंह हे एक कॉप्लेक्स व्यक्ति होते, आणि जेवढे पण महान लोक असतात.

जे महान विचारवंत असतात, ते वेगळ वेगळ्या विचारधारेच्या लोकांची पुस्तकें वाचतात त्या विचारधारेला समजून घेतात. त्या पासुन प्रेरणा घेतात, जर भगतसिंह यांच्या शालेलय जीवन पाहिल तर ते आर्य समाजी शाळेत जात होते. त्यांच बरोबर जर HSRA बद्दल बोललो तर हा पक्षाचा संस्थापक एक आर्य समाजी होते.

त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जॉइन नाही केली तर ते हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन मध्ये जाऊन हिंदूस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन असं नाव केल होत.

कारण ते सोशलिज्म ने पण प्रभावित झाले होते, त्यांनी लेनीनचे पुस्तकें वाचली कारण ते स्वता एक क्रांतिकारी होते, म्हणुन ते इतर क्रांतिकारी ची पुस्तक वाचत होते.

त्यांनी हे नाही पाहिलं की इतर देशात कम्युनिज्म लागु केल्यावर फेल झाली होती.

लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यांच बरोबर त्यांनी वीर सावरकर यांची पुस्तक पण वाचली होती. त्या पुस्तकांची आवृत्ति छापली होती, त्या पुस्तकांतील मुद्दे आपल्या डायरीत लिहीत होते.

आशात भगतसिंह यांना कम्युनिस्ट म्हणन चुकीच आहे.

सामप्त!

श्रीराज त्रिपुटे (ShriRaj Tripute)

shriraajtripute@gmail.com

अधिक माहिती साठी आपण वर दिलेल्या मेल आईडी वरती मेल करू शकता किंवा खाली दिलेल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर फॉलो करूं शकता…!

http://www.twitter.com/ShriRajTripute_

http://www.Instagram.com/ShriRajTripute

http://www.facebook.com/ShriRaajTripute


Comments

Popular posts from this blog

Bangal Famine of 1943

Kidnapping of Mufti Mohammad Sayeed's Daughter is Truth or Conspiracy

Golden Age of Afghanistan